योग आणि बालसंस्काराचा मूळ उद्देश.
या भारतात बंधूभाव नित्य वसू दे । हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे । मतभेद नसू दे ।। सकळांस कळो मानवता, राष्ट्रभावना । उद्योगी तरुण वीर शीलवान दिसू दे । दे वरची असा दे ।।
(राष्ट्रसंत तुकडोजी महाराज)
आपली मुले हीच आपली खरी संपत्ती आहेत. ती सर्वगुण संपन्न व्हावीत, उच्च शिक्षित व सुसंस्कारीत व्हावीत, असा आपला आग्रह असतो, त्यासाठीच आपली धडपड असते. याकरीता योग्य वयात म्हणजे वय वर्ष ५ ते १८ या वयातच योग्य संस्कार होणे हे अत्यंत आवश्यक असते. यातूनच उद्याची पिढी या देशाची आदर्श नागरिक, निर्व्यसनी, राष्ट्रभक्त बनेल यात तिळमात्र शंका नाही.
बालसंस्काराच्या या मुलभूत परंतु दुरगामी परिणाम करणाऱ्या या कार्याची सुरुवात. छ. शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, साने गुरुजी, स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर महाराज इ. महान व्यक्तिमत्व संस्कारांच्या पायावरच उभी राहिलीत. संस्कारांचे प्रतिबिंब आपणास वागण्या-बोलण्यात, राहणीमानात, निटनिटकेपणात दिसून येते. म्हणूनच बालसंस्कार या कार्याचा मूळ उद्देश आहे. या कार्यातून मानव घडविणे, सन्मार्गाला लावणे, तहयात निर्व्यसनी व शाकाहारी असावे, थोरामोठ्यांचा आदर राखावा व असे असंख्य आदर्श नागरिक असलेला भारत देश महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही. त्यामूळेच मनाला विचारांची, विचाराला ज्ञानाची, ज्ञानाला सत्कर्माची आणि या सर्वांना शेवटी बलोपासनेची जोड देणे हाच संस्कार, बालमनावर करण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे.
संस्काराच्या पायावरती। जीवन मंदीरे उभी राहती । तेणे होय सहज सुख प्राप्ती॥
संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल!
योग स्वरूप केंद्र, नाशिक मो. ९०२१२१३२३१, ८८३०३२२९८२